कॅन्सर च्या उपचारामध्ये दरवर्षी नवनवीन संशोधन होतात, परंतु CAR T-cell थेरपी ही एक क्रांतिकारी पायरी मानली जाते. आता या पेशी फक्त रक्तातील कर्करोगापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. यां पेशी आता घन ट्यूमरवर (solid tumors) हमला करण्यास सक्षम होत आहेत.

CAR T पेशी म्हणजे नेमकं काय?
CAR T पेशी म्हणजे रुग्णाच्या रक्तातून T- पेशी (T -Cell) बाहेर काढल्या जातात. लॅब मध्ये त्यांचे जेनेटिक मोडीफिकेशन (genetic modification) केले जाते, म्हणजेच त्यांना कॅन्सर पेशी ओळखण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता दिली जाते. नंतर या ” supercharged” पेशी पुन्हा त्या रुग्णच्या शरीरात सोडल्या जातात, मग त्या कॅन्सर पेशिंवर हमला करतात.
पूर्वीची मर्यादा फक्त रक्तातील कर्करोगपुरतीच यशस्वी :
या थेरपीने ल्यूकेमिया आणि लिंफोमा सारख्या रक्ताच्या कॅन्सरवर यश मिळवले परंतु घन ट्यूमरवर (फुफ्फुस, स्तन,मेंदू,यकृत ) यावर या पेशी परिणामकारक ठरत नव्हत्या त्याची कारण म्हणजे ट्यूमररभोवती असणार संरक्षण आवरण (tumour microenvironment), पेशींना ट्यूमरमध्ये पोहचण्यास येणाऱ्या अडचणी, ट्यूमर पेशींची स्वतःची छुपी प्रतिकारशक्ती.
नवीन झालेले बदल काय आहेत?
नवीन झालेल्या संशोधनामध्ये CAR T पेशीमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत ते खालीलप्रमाणे:
* या पेशी ट्यूमरच्या पृष्ठभागावरील विशिष्ट अँटीजन्स ओळखू शकतात.
* या पेशींना ट्युमरमधील कठीण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता दिली आहे.
* ठराविक संशोधकांनी CAR T पेशिंचे ” dual targetting version” विकसित केले आहे, जे एकाच वेळी दोन कॅन्सर पेशिंवर हल्ला करू शकतात.
जर ही पद्धत क्लिनिकल ट्रायल्समध्ये यशस्वी ठरली तर :
* घन ट्यूमर असणाऱ्या लाखो रुग्णांना नवीन उपचाराची आशा मिळू शकेल.
* केमोथेरपीसारख्या त्रासदायक उपचारांना पर्याय निर्माण होईल.
* वैयक्तिक उपचाराचं एक नव युग सुरु होईल.
CAR T थेरपीने विज्ञानाच्या जगात दाखवून दिल आहे की, आपल्या स्वतःच्या शरीरातील पेशी ह्या औषधासारख्या काम करू शकतात. घन ट्यूमरवरही या पेशिंचा हल्ला होणं शक्य असल्याने कॅन्सरची लढाई आता फक्त उपचाराची नाही, तर विजयाची आशा बनली आहे.
