आपल्या हसण्यामागच कारण सांगताना आपल हसन हे अजूनच वाढत हे तुम्ही कधी अनुभवलं आहे किंवा यावर कधी विचार केला आहे का? अनेकदा काय होत की कोणीतरी हसत असत आणि त्याला आपण विचारतो तू का हसतोयस? मग ते कारण सांगायला लागतात…. पण कारण सांगण्याआधीच त्या व्यक्तीला जास्तच हसायला येत. कधी कधी तर त्या व्यक्तीला बोलताही येत नाही, कारण त्यांचं हसनच थांबत नाही.

असं होण्यामगे नक्की काय कारण असेल? किंवा असं का होत असेल… चला तर मग जाणून घेऊया या मागच रहस्य.
1) आठवणीतील हसू:
जेव्हा आपण आपल्या हसण्यामागच कारण एखाद्याला सांगतो, त्यावेळी आपल्या मेंदूत तीच गमतीशीर आठवण किंवा तोच प्रसंग जसाच्या तसा समोर उभा राहतो. म्हणजे आपण जणू पुन्हा त्याच क्षणात जातो,त्यामुळेच आपल हसू दुप्पट होत.
2)मेंदूमधील “हैप्पी हार्मोन्स “:
आपण जेव्हा हसत असतो तेव्हा आपल्या मेंदूमधील डोपामीन आणि एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स स्त्रवतात. जेव्हा आपण तो प्रसंग आठवून दुसऱ्याला सांगायला लागतो, तेव्हा हे हार्मोन्स पुन्हा जागे होतात. त्याचाच परिणाम असा होतो की आपल्याला आपल हसन अनावर होत.
3) सामाजिक परिणाम :
कधी कधी काय होत कोणीतरी तुमच्याकडे लक्ष देऊन तुमचं बोलणं ऐकतंय, आणि त्यावेळी तुम्ही तुमचं हसण्याचं कारण सांगताय, हे पाहून तुमचं मन अजूनच रिलॅक्स होत. महत्वाची गोष्ट म्हणजे हसन हे संसर्गजन्य असल्यामुळे दुसऱ्यालाही हसायला भाग पाडत – आणि त्याचाच परिणाम म्हणजे हसण्याची साखळीच तयार होते.
4) Replay इफेक्ट :
आपण का हसतोय याच कारण जेव्हा आपण समोरच्याला सांगतो तेव्हा तो प्रसंग पुन्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, आणि तोच एक छोटासा replay असतो जो खऱ्या घटनेपेक्षा खूपच मजेशीर असतो.
“हसणं हे शंभर आजारांनवरच औषधं असत “हे म्हणतात ते खरच आहे. म्हणूनच असं म्हटलं जात की 90% लोक हे जेव्हा त्यांच्या हसण्याचं कारण सांगतात, तेव्हा ते पुन्हा त्या क्षणात जगतात आणि तेवढ्याने त्यांचं हसू थांबणं शक्यच होत नाही.


