वयानुसार स्नायुंची ताकद कमी होते, पण निरोगी जीवनशैलीने ती परत मिळवता  येते!

 वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात जसे की, त्वचेवर सुरकुत्या येणे, चयापचय (metabolism) मंदावणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नायुंची ताकद कमी होणे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी ती आपण थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो. त्यासाठी आपण योग्य जीवनशैली, सकस आहार  आणि पूरक असा व्यायाम  यांच्या मदतीने आपण ही प्रक्रिया कमी करू शकतो.

स्नायूची ताकद कमी होण्यामागची कारणे :

1. शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल.

2. स्नायूच्या पेशिंची वाढ किंवा नवीन पेशी निर्माण होण्याची गती मंदावणे.

3. शरीराची हालचाल कमी होणे.

4. प्रथिनांचे सेवन अपुरे राहणे.

 या कारणांनी शरीरातील स्नायूचे प्रमाण(muscle mass) कमी होऊ लागते आणि त्यालाच सार्कोपेनिया (Sarcopenia) म्हटले जाते.

निरोगी जीवनासाठी काही प्रभावी सवयी:

1. नियमित व्यायाम :

आपल्याला जर स्नायूची ताकद टिकवून ठेवायची असेल तर रेसिस्टन्स ट्रेनिंग म्हणजेच वजन उचलण्याचे व्यायाम, पुशअप्स, योगासणे  करणे गरजेचं आहे.

2. पुरेसे प्रोटीन :

रोजच्या आहारात अंडी, दूध, डाळी, कडधान्ये, पनीर, मासे यांचा समावेश केल्याने स्नायूची वाढ चांगल्या प्रकारे होते.

3. प्रमाणात पाणी आणि झोप: 

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायुंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, तसेच पुरेशी झोप स्नायुंना पुणनिर्मानाची संधी देते. त्यासाठी आपल्याला दिवसाला 7-8 तास झोप आणि 2-3 लिटर पाणी आवश्यक आहे.

4. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D: 

हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम अत्यंत महत्वाचे आहे.

5. जीवनशैलीतील बदल:

 दररोज चालणे, लिफ्टच्या ऐवजी जिन्याचा वापर करणे, घरातील हलकी कामे स्वतः करणे यासारख्या अनेक छोट्या गोष्टी आपल्या शरीरात मोठा फरक घडवू शकतात.

असं म्हणतात वय फक्त एक नंबर आहे, स्नायूची ताकद वयोमानानुसार कमी होते खरी, पण ती पुन्हा वाढवता येते हेही तितकेच खरे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal