योग्य मातीची निवड – रोपांच्या आरोग्याचा पाया

योग्य मातीची निवड करून, तुम्ही तुमच्या रोपांची वाढ, आरोग्य आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करू शकता, तुम्हाला फक्त पद्धत माहित असणे आवश्यक आहे.

माती:

आपल्या घरामध्ये किंवा बागेत जी काही झाडे लावलेली असतात त्यांचा मूळ पाया म्हणजेच माती. मातीपासून रोपांना पोषण, पाणी, हवा आणि सूक्ष्मजीव मिळतात. त्यामुळे माती निवडणे हे रोपांसाठी अत्यंत आवश्यक असते.

मातीचे प्रकार : 

1. मुरमाड माती: 

ही माती सगळ्यात चांगली मानली जाते. यामध्ये वाळू, चिकणमाती,आणि सेंद्रिय घटक असतात. ही माती पाणी धरून ठेवते त्यामुळेच प्रामुख्याने फुलांच्या आणि भाज्यांच्या रोपांसाठी ही माती वापरली जाते.

2. चिकणमाती:

ही माती वजनाने जड असते. या मातीमध्ये जास्त  पाणी साठून राहते परंतु ही पोषक घटकांनी समृद्ध आहे. या मातीमध्ये वाळू किंवा सेंद्रिय खत मिसळून आपण तिचा वापर करू शकतो.

3. वाळूमिश्रित माती: 

या मातीमध्ये  पाणी जास्त काळ टिकत नाही, त्यामुळेच रोपांना नियमित पाणी आणि खतांची गरज लागते.

4) दुमट माती:

या मातीची धारणशक्ती चांगली असते, परंतु जलनिकास कमी असल्याने यामध्ये योग्य प्रमाणात खत आणि वाळू घालावी लागते.

मातीची निवड:

* फुलझाडे, भाजीपाला किंवा इंडोअर प्लांट या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची गरज असते. त्यामुळे रोपाचा प्रकार कोणता आहे ते समजून घ्या.

* झाडांना 6 ते 7.5  पीएच असलेली माती  योग्य असते. त्यामुळे मातीची पीएच पातळी तपासा.

* शेणखत, कंपोस्ट किंवा कोकोपीट मिसळल्याने माती हलकी आणि पोषक बनते.

उपयुक्त माहिती: 

* रोपांची वाढ चांगली होण्यासाठी दर 5-6 महिन्यांनी माती उकरून हलकी करून त्यामध्ये खत मिसळा.

* जुन्या मातीला सूर्यप्रकाशात वाळवून निरजंतूक करून घ्यावी.

* प्रत्येक झाडाच्या वाढीनुसार त्याच्या मातीमध्ये आवश्यक ते घटक मिसळून घ्यावे.

अशा प्रकारे योग्य मातीची निवड केली तर आपली झाडे अधिक ताजी, हिरवीगार आणि दीर्घायुषी राहतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal