निसर्गाच्या विविधतेमध्ये प्रत्येक प्राणी हा आपली एक वेगळी कहाणी सांगतो. त्यामुळेच काही प्रजाती ह्या त्यांच्या अकारामुळे, तर काही प्रजाती त्यांच्या वैशिष्ट्यामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजेच “मनीचयमान” (manikyam) जगातील सर्वात लहान गाय जी भारताच्या अभिमानाचा एक भाग आहे.
असे म्हणतात की ही गाय फक्त आकाराने लहान नसून, तिच्यामागे संवर्धन, संस्कृती आणि निसर्गसंपदेची खूप मोठी गोष्ट दडलेली आहे.

मनीचयमान गाय आली कुठून?
मनीचयमान गाय ही केरळ राज्यातील अथोली गावात आढळते. 2015 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या गायीचे नाव नोंदवले गेले त्याच महत्वाचं कारण म्हणजे तिची ऊंची ती फक्त 61.5 सेंटीमीटर ( दोन फुटांपेक्षा कमी) आहे. ही गाय व्हेचकुरिशी (vechur) जातीची आहे, जी भारतामध्ये सर्वात लहान आणि दुर्मिळ मानली जाते.
वैशिष्ट्य :
1. फक्त दोन फूट उंची आणि वजन 30-40 किलो
2. स्वभावाने शांत, ममत्व असणारी आणि अत्यंत जिज्ञासू.
3. या गायिमध्ये दूध देण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी तिच्या दूधामध्ये फॅट आणि औषधी गुणधर्म असतात.
4. ही गाय कमी अन्नावरही टिकून राहते आणि उष्णतेतही सहज जगते.
संवर्धन :
आज जागतिक स्तरावर स्थानिक जातींचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. जास्त दूध देणाऱ्या विदेशी गायिनमुळे स्थानिक जातींचे महत्व कमी होत चालले आहे. त्यामुळेच मनीचयमानसारख्या गायी केवळ आर्थिक नव्हे, तर जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही महत्वाच्या आहेत.
जतन :
या गाईंचे जतन केल्याने हवामानाशी जुळणाऱ्या प्रजाती टिकून राहतील. तसेच देशी जनावरांच्या औषधी आणि पोषक गुणधर्माचे संरक्षण होईल. भविष्यातील शेती आणि पशुपालणासाठी स्थिर जणूकसंपत्ती (genetic diversity)उपलब्ध होते.
निसर्गाचा आदर करणं म्हणजेच आपल्या भविष्याच रक्षण करणं. मनीचयमानसारख्या दुर्मिळ प्रजाती आपल्याला आठवण करून देतात की ” लहान असणं म्हणजे काही कमी नाही.” निसर्गाच प्रत्येक रूप अनोख आहे आणि त्याच जतन करणं हीच खरी प्रगती आहे.


