फास्टॅग नसलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी!दुप्पट टोल भरण्याची गरज नाही –  जाणून घ्या नवीन नियम.

आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फास्टॅग (Fastag) चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. टोल नाक्यावरचा वाहनांचा वेळ वाचावा आणि वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी ही डिजिटल टोल सिस्टीम सुरु करण्यात आली.परंतु अनेक वेळा काही वाहनचालकांकडे फास्टॅग नसतो किंवा तो अचानक कामं करत नाही अशा वेळी दुप्पट टोल शुल्क भरायला लागायचे. पण आता या नियमात बदल करण्यात आला आहे!

नवीन लागू होणारे नियम काय सांगतात?

हे नवीन नियम 15 नोव्हेंबर 2025 पासुन लागू होणार आहेत.

* फास्टॅग नसलेले किंवा अकार्यक्षम फास्टॅग असलेल्या वाहचालकांनी जर UPI द्वारे पेमेंट केले तर त्यांना फक्त 1.25 पट टोल शुल्क द्यावा लागेल.

* या अगोदर अशा वाहणांना दुप्पट टोल भरावा लागत असे. यामुळे वाहनांवरील जास्तीचा आर्थिक भार कमी होईल.

* जर तुम्ही कॅश देऊन टोल भरत असाल तर,दुप्पट  शुल्काचे जुने नियम लागू होतील.

असा निर्णय घेण्यामागचा उद्देश :

* डिजिटल पेमेंटला महत्व देऊन सरकारने फास्टॅग सोबत इतर डिजिटल व्यवहार देखील सोपे करायचे आहेत.

* वाहनचालकांना एक पर्यायी मार्ग देणे हा एक महत्वाचा उद्देध आहे.

* दुप्पट पैसे भरावे लागल्यामुळे वाद वाढत होते, त्यामुळे हा पर्याय सोप्पा ठरेन.

या निर्णयाचे फायदे कोणाला होतील?

* ज्या लोकांचे फास्टॅग कामं करत नाहीत असे लोक UPI द्वारे तात्पुरते पेमेंट करू शकतील.

* कधीतरी प्रवास करणाऱ्या किंवा भाड्याने घेतलेल्या गाडीने प्रवास करणार्यांना

नवीन निर्णय लागू होणार असला तरी काय लक्षात ठेवावे?

 * फास्टॅग वापरणे चालूच असणार आहे.

* UPI पर्याय हा फक्त तात्पुरता उपाय आहे, दीर्घाकालीन नाही.

* कॅश पेमेंट केल्यावर अजूनही दुप्पटच टोल भरावा लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal