“पाच दरवाज्यांच्या पलीकडचे जग” हे खरच रहस्यमय आहे. कारण या दरवाज्यांमागे इतिहास, भीती आणि आश्चर्य लपलेले आहे.

1.पद्मनाभस्वामी मंदिराचा गुप्त दरवाजा : भारत
हे मंदिर केरळमधील तिरुवनंतपूरम या ठिकाणी आहे.या ठिकाणाचे रहस्य म्हणजे या मंदिरात सहा गुप्त दरवाजे आहेत, त्याच सहा दरवाज्यापैकी ‘व्हॉल्ट बी ‘ हा दरवाजा अजूनही उघडला नाही. यामागची कथा सांगते की तो दरवाजा नागदेवतांनी सुरक्षित केला आहे. खूप सारे वैज्ञानिक प्रयत्न करूनही तो दरवाजा उघडला गेला नाही. त्यामागे अशी कथित म्हण आहे की जर हा दरवाजा उघडला तर जगावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. असही म्हटलं जात की भारतातील सर्वात मोठा खजिना याच ठिकाणी लपवलेला असू शकतो.
2.ओक आयलंड मनी पिट – कॅनडा
हे ठिकाण कॅनडामध्ये नोव्हा स्कोशिया येथे आहे. या ठिकाणाचे रहस्य म्हणजे 1795 मध्ये या ठिकाणी काही लोकांना एक खड्डा आढळून आला, ज्या खड्यात प्रत्येक थरात काहीतरी वेगळं मिळत होत. खूप शतकांपासून विश्वास मानला जातो की इथे खजिना किंवा नाईट्स टेम्पलरचे दस्तऐवज दडले आहेत. परंतु आजपर्यंत या दरवाजाच्या मागे कोणालाही काहीच सापडले नाही.
3. पोग्वेलिया द्विपाचा प्रवेशद्वार – इटली
हे ठिकाण इटलीमध्ये व्हेनिसजवळ आहे. हे एक बेट असून जगातील सर्वात जास्त भूताटकीचे ठिकाण मानले जाते. 1700 मध्ये इथे प्लेगग्रस्त लोकांना जिवंत पुरले जात असे. काही काळानंतर या ठिकाणी मानसिक रुग्णांसाठी रुग्णालय सुरु करण्यात आले. या बेटावर जाण्यासाठी सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे हा दरवाजा भूतकाळाचा प्रवेशद्वार म्हणून परिचित राहिले आहे.
4. स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट – नॉर्वे
हे ठिकाण नॉर्वे येथील लॉंगइअरबेन, आर्किटक सर्कल येथे आहे. यां ठिकाणी मानवजातीच भविष्य सुरक्षित ठेवणार बीज भांडार आहे, जो हा जगातील सुरक्षित दरवाजा उघडल्यावर दिसतो. इथे जगातील सर्व प्रकारची धान्य, फळ आणि वनस्पतीची बियाणं ठेवलेली आहेत. हा दरवाजा म्हणजेच जगाचा पुनर्जन्म सुरु होण्याचा मार्ग आहे.
5. बाघ मंदिराचा गुप्त दरवाजा – इंडोनेशिया
हे ठिकाण इंदोनेशिया मध्ये जावा बेट येथे आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या प्राचीन मंदिरात एक भुयारी मार्ग आहे जो पृथ्वीच्या आतल्या नगरीकडे जातो. वैज्ञानिकांना याचा पुरावा अजूनतरी मिळालेला नाही, पण तो दुसऱ्या जगाकडे जाणारा दरवाजा मानला जातो.


