दिवसभरामध्ये सगळेच जण व्यस्त असतात- अभ्यासामध्ये, घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये, ऑफीच कामामध्ये आणि अशी बरीच कामं करत करत सगळेच व्यस्त होऊन जातात.
परंतु तुम्हाला हे माहित आहे का? फक्त 60 सेकंदाचा ब्रेक आपल मन आणि शरीर यामध्ये मोठा फरक घडवू शकतो. काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, दर 30-40 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतला तर आपली एकाग्रता वाढते आणि ताणही कमी होतो. फक्त एक मिनिटासाठी उठून चालणे, खोल श्वास घेणे किंवा डोळे बंद करून विश्रांती घेणे एवढं जरी केल तर ते आपल्या मेंदूला ‘रिफ्रेश’ करण्यासाठी पुरेसं आहे.

शारीरिक फायदे :
1. डोळे बंद करून विश्रांती घेतल्याने आपण जे स्क्रिनकडे सतत पाहतो त्यामुळे होणारा थकवा कमी होतो.
2. थोडंसं चालल्याने शरीरातील ऊर्जा प्रवाहित होते.
3. एका मिनिटाच्या स्ट्रेचिंग क्रिया करण्याने मान आणि खांद्यातील वेदना कमी होतात.
मानसिक फायदे:
1. छोटा ब्रेक मेंदूला नव्या कल्पना सुचवतो त्यामुळे एकग्रता वाढते.
2. खोल श्वास घेतल्याने ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो त्यामुळे ताण कमी होतो.
3. 1 मिनिट स्वतःसाठी काढल्याने उत्साह वाढतो.
ब्रेक कसा घ्यायचा?
1. कामं करत असताना खुर्चीतून उठून खिडकीबाहेर पाहणे.
2. शांत बसून खोल श्वास घेऊन मन रिकामं करणे.
3. हलक स्ट्रेच करा किंवा हलकस हसा.
4. थोडंसं चालून बघा.
सतत ऍक्टिव्ह राहण्यासाठी प्रत्येक वेळी काम करणं गरजेचं नाही तर स्मार्टपने काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक तासातला फक्त 1 मिनिट वेळ स्वतःला द्या, तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमचं मन हे शांत आणि ऊर्जावान झालं आहे.


