डिजिटल डिटॉक्स का महत्वाचे आहे? स्क्रीन पासून दूर राहिल्याने तुमचे मानसिक आरोग्य कसे सुधारेल?

आजच्या जगात तंत्रज्ञान खूप महत्वाचे आहे,परंतु तेच तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, पण जर तेच आपल्या मनावर राज्य करू लागले तर कुठेतरी थांबणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय?

डिजिटल डिटॉक्स म्हणजे ठराविक काळासाठी संपूर्णपणे स्क्रिनपासून, सोशल मिडीयपासून आणि तांत्रिक उपकरणापासून दूर राहणे.

डिजिटल डिटॉक्स का महत्वाचे आहे?

आजकाल आपण अशा जगात वावरतो जिथे स्क्रिन ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाली आहे. कामासाठी लॅपटॉप, एकमेकांना संपर्कासाठी मोबाईल आणि मनोरंजनासाठी टीव्ही किंवा सोशल मीडिया. या सगळ्या गोष्टींनी आपले आयुष्य सोप्पे नक्कीच केले आहे, परंतु त्याबरोबरच आपले मन थकवण्याचे कामही सुरु केले आहे. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स गरजेचे झाले आहे.

डिजिटल डिटॉक्स मुळे आपल्या आरोग्यावर होणारे फायदे:

1. मन शांत आणि एकाग्र होते:

सततचे येणारे नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडियाच्या गोंधळापासून शांती मिळते. यामुळेच आपले विचार अधिक स्पष्ट होतात त्याचबरोबर निर्णयक्षमता देखील वाढते.

2. ताणतणाव कमी होतो:

डिजीटल डिटॉक्स मुळे आपण वास्तवात जगायला शिकतो. दुसऱ्यांच्या परफेक्ट आयुष्याची तुलना  करण्याची सवय हळूहळू कमी होऊन जाते.

3. झोपेची गुणवत्ता सुधारते:

मोबाईल स्क्रिनपासून दूर राहिल्याने आपली झोप ही अधिक शांत होते. त्याचबरोबर आपल्या हार्मोन्समध्ये सुधारणा होते.

4. नात्यांमध्ये सुधारणा:

मेसेजद्वारे होणारे संभाषण कमी करून आपण जेव्हा समोरासमोर भेटतो, बोलतो तेव्हा आपल्यातील भावनिक नातं हे घट्ट होत. थोडा वेळ निसर्गात, स्वतःच्या विचारात घालवल्याने आपल्यातील आत्मविश्वास वाढतो.

डिजिटल डिटॉक्स सुरु करण्यासाठीचे उपाय:

* सतत येणारे नोटिफिकेशन बंद करा त्यामुळे आपला मेंदू विचलित होणार नाही.

* दिवसभरात “नो स्क्रीन टाइम” ठरवा त्याचबरोबर उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी कमीत कमी 30 मिनिटे तरी स्क्रीन पासून दूर रहा.

* वाचन, योगा, चालणे, एखाद्या निसर्गाशी निगडित गोष्टीत रमणे, तुमचे जे काही छंद असतील ते जोपासा इ. असे केल्याने आपला मेंदू फ्रेश राहतो.

* एकमेकांशी संवाद आणि हसणे यामुळे मानसिक तणाव दूर होतो त्यासाठी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा.

तंत्रज्ञान आपल्यासाठी बनले आहे आपण त्यासाठी बनलो नाही, त्यामुळेच त्याचे गुलाम होऊ नका. डिजिटल डिटॉक्स ही एक छोटीशीच पण परिणामकारक कृती आहे, तिच  कृती आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

0

Subtotal