भारताच्या इतिहासात SUV सेगमेंटमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेलेले नाव म्हणजेच “TATA Sierra.” या मॉडेलची आठवण एक आयकॉनिक म्हणवली जाते. परंतु Sierra आता परत नवीन एन्ट्री घेत आहे.

काय आहे Sierra चा इतिहास?
Sierra 1991 मध्ये लाँच झाली होती आणि त्यावेळी ती भारतामध्ये पहिली खऱ्या अर्थाने SUV पैकी एक होती. Sierra ही Tata Motors च्या X2 आधारित 3-डोअर बॉडी स्टाईलमध्ये उपलब्ध होती. आता टी मार्केटमध्ये तिच्या नवीन मॉडेलसह पुनरागमन करत आहे, ज्यामध्ये ICE आणि EV हे दोन्ही पर्याय असतील.
कस असेल sierra च नवीन मॉडेल?
* नवीन Sierra मध्ये बॉक्सिय आणि मस्क्युलर SUV प्रोपोर्शन दिसतील, मोठे चाक, ब्लॅक रुफलाईन, LED लाईट बार असे अनेक आधुनिक टच या कार मध्ये असणार आहेत.
* यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे triple-screen डॅशबोर्ड सेटअप.
* ICE मॉडेलमध्ये 1.5 लिटर नैसर्गिक आस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन येण्याची शक्यता दिली जातेय.
* टॉप व्हेरिएंटमध्ये 1.5 टर्बो-पेट्रोल किंवा EV व्हेरिएंट अशीही कल्पना भविष्यामध्ये असण्याची शक्यता आहे.
मार्केटमध्ये कधी येईल Tata Sierra?
* भारतामध्ये ही कार 25 नोव्हेंबर 2025 ला लाँच होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
* अंदाजे या कारची किंमत 15 लाख ते 25 लाख या दरम्यानअसू शकते.
* नवीन मॉडेलअसल्यामुळे सुरुवातीला काही काळ कार डिलिव्हरीला वेळ लागू शकतो.
* Sierra ही मीड साईझ सेगमेंटमध्ये उतरत आहे त्यामुळे तिची तुलना ही Hyundai Creta, Kia Seltos आणि Tata Harrier सोबत होऊ शकते.
नवीन Sierra हे एक असं मॉडेलआहे ज्यामध्ये इतिहासातील पात्रतेबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा आहे त्यामुळे निश्चितपणे हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. मात्र खरेदी करताना थेट-अनुभव, टेस्ट ड्राईव्ह इतर सर्व खर्च या गोष्टी तपासणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
